Wednesday, January 9, 2013

pg 7-- अणिमा वर्ध्यामधे



 pg 7-- अणिमा वर्ध्यामधे
मुंबईची गाडी वर्धा स्टेशनांत शिरली तेंव्हा सकाळचे नऊ वाजायला आले होते. फर्स्टक्लासच्या डब्यांत असल्यामुळे अणिमाला प्रवासाचा शीण जाणवत नव्हता. झोपही छान झाल्यामुळे ती ताजीतवानी झाली होती. गरम-गरम उपमा आणि चहाचा नाश्ताही करून झाला होता.

परवाच पेठकर, वर्ध्याचे रिसेप्शन ऑफिसर यांनी फोनवर तिच्याशी संपर्क साधला होता -- तिची ट्रेन, बोगी नंबर, सीट नंबर इत्यादि विचारण्यासाठी, आणि मी स्टेशनवर येणार आहे निश्चिंत असा असे आश्वासनही दिले होते.

Part 1/2 ---- Pg 1-6 हस्तलिखित


1
श्रीकृष्णाने सकाळची सर्व कामे आज लवकर संपवली होती. राजसभेतील चर्चेतही फारसा भाग घेतलेला नव्हता. आजचा दिवस निर्णायक असेल असे राहून राहून वाटत होते. होऊन जाउ दे तसेच. घेउन टाकायचा काही तरी निर्णय. ही अनिश्चिततेची भिती कधी तरी संपायलाच हवी. 
“ती माझ्याशिवाय कोण संपवणार?” त्याने मनाला विचारले. हस्तिनापुरीची शिष्टाई  निष्कळ ठरली होती. ती तशीच ठरावी अशी द्रौपदीची इच्छा होती. 
याआधी युधिष्ठिराने युद्ध टाळावे यासाठी प्रस्ताव केले होते. राजसूय  करणाऱ्या मोठ्या साम्राज्याच्या सम्राटाने फक्त पाच गावांचे राज्य दिले तरी  चालेल असा निरोप  काका घृतराष्ट्र यांना पाठवला होता, त्यावर सुईच्या आग्रभागावर टिकेल एवढी जमीन सुद्धा देणार नाही असे म्हणत दुर्योधनाने तो प्रस्ताव धुडकवून लावण्यास श्रृतराष्ट्राला भाग पाडले होते. त्यानंतर पुन्हा एकदा समोपाचाराचा  प्रयत्न करावा म्हणून युधिष्ठिराने शिष्टाई साठी कृष्णाला गळ घातली होती, तेव्हासुद्धा युद्ध टाळावे हीच भूमिका व पाच गावांवर समाधान मानू हाच निरोप कृष्णामार्फत देण्याचे ठरले होते. पण द्रौपदी आपले मोकळे सोडलेले केस हातात पुढे धरून त्याच्या समोर ठाकली होती. दुःशासनाने हेच मोकळे केस धरून फरफटत सभागृहात आणले आणि भर सभेत अपमान केला ते सगळ विसरणे कसे शक्य होते?  
“ कृष्णा, हे मोकळे केस बघ। दुःशासनाने केस धरून सभेला आणले तेव्हा भीमाने प्रतिज्ञा केली  होती की दुःशासनाचा वध करूण त्याच्या रक्ताने तुझे केस माखून तुझी वेणी घालून देईन । ती प्रतिज्ञा भीम विसरलेला नाही - मीही विसरलेली नाही . पण आज युधिष्ठिर शांतीच्या व युद्ध  टाळण्याच्या गप्पा करीत आहेत. युद्ध झालेच नाही तर ती प्रतिज्ञा अपूरी राहील आणि जन्मभर मला मोकळ्या केसांनीच वावरावे लागेल.” 
अवाक् होऊन सर्वजण ऐकत होते. युधिष्ठिराच्या शब्दाविरूद्ध बोलण्याची प्राज्ञा इतर चार पांडवांची नव्हती . पण द्रौपदी म्हणजे सळसळती वीज होती. एरवी  मेघांच्या पोटांत दडून राहणार - शांत, गुप्त, पण प्रकट झाली की क्षणार्धात सर्वांना लखलखाटाने दिपवून टाकणार. तिच्या तेजापुढे  प्रसंगी कृष्णालाही नमते घ्यावे लागले होते, मग युधिष्ठिराची काय कथा? 
(कुन्तीने काय म्हटले)
कृष्णालाही द्रौपदीचा मुद्दा मान्य होता. शिष्टाईला गेलेल्या श्रीकृष्णाच्या अपेक्षेप्रमाणेच दुर्योधन वागला होता.
------------------------------------------------------------------------------------------------------------
2
                                 
मसूरी, 1984
गेल्या महिनाभर तयारी करीत असलेली , तरीही जराशी सुस्तावलेली लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकादमी सकाळपासून गजबजत गेली होती. नवीन बॅचचे प्रोबेशनर सकाळपासून निरनिराळ्या वाहनातून  येऊ लागले होते. कुणी चक्क यूपी स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसमधून तर कुणी टॅक्सी, कुणी एसी कॅब व कुणी पालकांच्या आलीशान गाडीतून प्रवास करून येत होते. देशाच्या कानाकोपर्यातून आलेल्या तरूण-तरूणी मंडळींचा उत्साह ओसंडून वहात होता. आणि का नाही? देशाच्या सर्वोच्च सिव्हिल सर्व्हिस  परिक्षेतून निवडलेली क्रीम ऑफ क्रीम अशी ही मंडळी होती. 
अणिमा आणि राधा चेन्नईहून एकट्याच आल्या होत्या. रेलवे स्टेशनवर त्यांची गाठ पडली होती, आणि त्यांना एकमेकींची साथ मिळाली म्हणून दोघींच्या पालकांना हायसे वाटले होते. 
अणिमा ही केरळच्या एका खेडेगावांतली मुलगी- शिक्षणासाठी त्रिवेंद्रम पर्यंत जाऊन आलेली.  तिथे मामाच घर बर की कॉलेज बर। पण परदेशस्थ चुलत भावाच्या प्रेरणे ने आयएएस होण्याचे स्वप्न मात्र तिने पहिले होते आणि स्पर्धा परिक्षेची नीट तयारी करवून घेणारे शिक्षक ही लाभून गेले होते. रेलवेचा हा सर्व प्रवास तिला नवखा होता. फारशी काळजी किंवा चिंता करण्याचा तिचा स्वभाव नाही। पण गाफील राहूनही चालणार नाही या जगात। आज एक खेड्यातली मुलगी भारताच्या एका टोकापासून प्रवास करून दूसऱ्या टोकाला जात होती. पुढेही निरनिराळे प्रदेश हिंडावे लागणार होते. राष्ट्रगीतातील वर्णनाप्रमाणे पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, दक्षिण भारताचा पट्टा, उदिशा, बंगाल, आसाम, असे सर्व प्रदेश तिला पहायला मिळतील या कल्पनेने ती सुखावली होती.
---------------------------------------------------------------------------------------